
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वमान्य श्रेष्ठ अशी संस्कृती मानली जाते. कुटूंब व्यवस्था ही सांस्कृतिक वारसा मानली जाते.कुटुंब व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो , त्यामुळे भारतात आजही बहुसंख्य सदस्य असलेले कुटुंब बघायला मिळतात.
सामाजिक परिस्थितीतील परिवर्तन,अतिमहत्वाकांक्षा, अनावश्यक गोष्टींचे पाश्चात्य अंधानुकरण व संवादाचा अभाव यामुळे आजच्या काळात कुटुंबातील विसंवाद व अंतर वाढताना दिसत आहे.

त्यामुळे कुटूंबात संवाद साधला जावा व कुटुंबव्यवस्था सुदृढ व सुरक्षित राहण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाची गरज असल्याची भावना प्रमुख अतिथी व कवी राजेंद्र सोमवंशी यांनी व्यक्त केली.
२३ ऑक्टोंबर २०२६ रोजी
” कौटुंबिक न्यायालय, नाशिक च्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त
” कौटुंबिक न्यायालयाची गरज ” या विषयावर प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
न्यायाधीश मा.श्री.पेटकर व न्यायाधीश मा.श्री.पालसिंगकर यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर न्यायाधीश मा.श्री.पेटकर साहेब
न्यायाधीश मा. श्री.पालसिंगनकर साहेब
समुपदेशक श्री.शिंदे साहेब
श्री.पाटणकर साहेब
वकील संघाच्या अध्यक्षा अँड. वर्षा देशमुख, उपाध्यक्ष श्री.शिरीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन अँड. बाळकृष्ण मोरे यांनी केले तर आभार अँड.शिरीष पाटील यांनी मानले.


