
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
ठिकाण: सुंदरपुर तालुका निफाड, जिल्हा नाशिक
दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगाम व्यवस्थापन 1.कमी पाणी लागणारी पिके निवडावीत जसे हरभरा, ज्वारी,कमी पाण्यावर येणारा गहू. 2.पाणी देण्यासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन चा वापर करावा. 3.उसासारख्या पिकास सरी आड सरी पाणी द्यावे.
4.ऊस पिकातील पाचट जाळू नये त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा.
5.पाचट कुजून उत्तम सेंद्रिय खत तयार होते त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. 6.विकास पाण्याचा ताण पडल्यास 13:0:45 या विद्राव्य खताचे 1% तीव्रतेची फवारणी घ्यावी.
7.उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. त्यात बिजामृत, जीवामृत, घनजीवामृत जैविक कीटकनाशके निमाश्र, ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र, दशपर्णी अर्क इत्यादींचा वापर करावा.
8.जनावरांना मुबलक चारा उपलब्ध मिळण्यासाठी चारा पिकांची लागवड करावी. यासाठी मका,ज्वारी, ओट, लसुन घास, बरसिम इत्यादी पिकांची रब्बी हंगामात लागवड करावी.
- पिकांच्या कडेने उंच वाढणारे शेवारी सारख्या पिकाच्या ओळी लावाव्यात
- पिकांना अच्छादनाचा वापर करावा जेणेकरून बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची गरज कमी होईल.
डॉ भरत मालुंजकर
वरिष्ठ संशोधन सहायक (कृषिविद्या),
कृषि संशोधन केंद्र, कुंदेवाडी, निफाड


