
अंदरसूल (प्रकाश साबरे)
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला शाखेच्या वतीने येवला तालुक्यातील प्रॅक्टिशनर डॉक्टरांचा सन्मान संपन्न झाला.
डॉक्टर डेचे औचित्य साधून येवला ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र पटेल कॉलनी या ठिकाणी सर्व डॉक्टरांसाठी ‘प्रिस्क्रिप्शन युवर सेल्फ’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे एम.डी., रेडिओलॉजिस्ट विभाग प्रमुख डॉ.राजेश जावळे यांचे व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान डॉक्टरांसाठी जे अथक, अविश्रांत, सहृदय रुग्णांची सेवा करतात त्यांच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरले व डॉक्टरांना देखील ज्या समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी उपयुक्त होते.
सकाळी ७:३० ते ९:३० या प्रथम सत्रात सर्वप्रथम सर्व डॉक्टरांचे शब्दसुमनांनी व तिलक, गुलदस्ता देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर येवला तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष, व्याख्याते डॉ.तुषार साळुंखे, डेन्टिस्ट डॉ. मनिषा कापडणीस तसेच सर्व डॉक्टरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजयोगिनी ब्रम्हाकुमारी निता दिदी तसेच संस्थेचा परिचय प्राध्यापक सीताराम निकुंभ यांनी दिला.रेडिऑलॉजिस्ट ब्रम्हाकुमार डॉ. राजेश जावळे हे ब्रम्हाकुमारी विद्यालयात मागील 40 वर्षांपासून रेग्युलर सक्रिय मेडिटेशन ट्रेनर म्हणून सेवा देतात. व्याख्याते डॉ. जावळे यांनी सर्व डॉक्टरांना “प्रिस्क्रिप्शन फॉर सेल्फ” या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. सर्व डॉक्टर्स या व्याख्यानाने मंत्रमुग्ध झाले. डॉक्टरांना देखील कौटुंबिक, शारीरिक, सामाजिक समस्या असतात व त्याच्यासाठी त्यांना स्वतःला स्वतः हील करणे आवश्यक आहे.

