
दि.९ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनास शिक्षक परिषदेचा जाहीर सक्रिय पाठिंबा
दि.९ जुलै २०२६ रोजी शिक्षकांच्या विविध प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद -नाशिक राज्य कार्यकारिणीने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत तालुका,जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक परिस्थिती बघून शिक्षक हितासाठी पाठिंबा जाहीर करत आहे.
या आंदोलनामध्ये पुढील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे:
1️⃣-शिक्षकांवर सक्तीने लागू करण्यात आलेली TET/ CTET प्रणाली रद्द करावी.
2️⃣अशैक्षणिक काम म्हणून गणल्या गेलेल्या SIR व BLO कार्यक्रमाची सक्ती थांबवावी.
3️⃣ सहाय्यक BLO तात्काळ रद्द करून धाराशिव जिल्ह्याच्या धर्तीवर बीएलओ कामाचा निर्णय घेण्यात यावा
4️⃣ अंशतः अनुदानित वाढीव टप्पा तात्काळ लागु करून प्रचलित निर्णयाची अंमलबजावणी व्हावी
5️⃣शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या व पदोन्नतीच्या शासकीय निर्णयानुसार निर्णय घ्यावा.
6️⃣सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
7️⃣ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शासकीय कामांचे आदेश शिक्षण विभागाकडूनच देण्यात यावे.
8️⃣ महसूल विभागाच्या सर्व कर्मचारी यांनी शिक्षकांच्या पदाचा व सेवेचा मान सन्मान राखून वर्तन करावे.
9️⃣ अशैक्षणिक कामामुळे माध्यमिक शाळा मध्ये शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याकारणाने त्याबाबतचा निर्णय तात्काळ घ्यावा.
🔟 संच मान्यता निर्णय दुरुस्ती करून जुन्या पद्धतीने लागु करावी.
जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सामूहिक रजा घेवून आंदोलनात सहभागी व्हावे तसेच BLO व SIR काम करणार्या तसेच DCPS / NPS धारक शिक्षक बंधू-भगिनींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी, अशैक्षणिक कामे टाळण्यासाठी व जुनी पेन्शनच्या लढ्यासाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक यांच्यावतीने करण्यात येत आहे.
” शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण आणि मराठी शाळा वाचवणे हा आमचा अधिकार !”.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नाशिक
डी.यु.अहिरे, राजेश शिंदे, सचिन पाटील, दत्ता वाघे पाटील , संजय पाटील,शंकर सांगळे, शरद निकम,अनिल सिंग परदेशी, बी.के.जाधव, विनित पवार, सचिन मेधने , सुनिल आहेर, संजय पवार, भारत खैरनार ,विजय राजभोज, विलास सोनार, गोकुळ चव्हाण, बैरागी, अविनाश निकम, विजय बडे, मांडवाडे सर.
विजय बडे- 9604686096

