
धुळे( प्रतिनिधी ) निसर्ग मित्र समिती धुळे व न विद्यमाने वन महोत्सव सप्ताह निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
धुळे येथील ज्येष्ठ विधीतज्ञ माजी न्यायाधीश ॲडवोकेट जे.टी. देसले. सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भदाणे ज्येष्ठ समाजसेविका सुलोचना अग्रवाल निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रेमकुमार अहिरे निसर्ग मित्र समितीचे राज्याचे महासचिव संतोषराव पाटील, यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव स्वप्निल भदाणे ,निसर्ग मित्र समिती चे शिंदखेडा तालुकाध्यक्षआर आर सोनवणे,आदर्श शिक्षक कांतिलाल देवरे,ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष बोरसे सर तालुकाध्यक्ष भास्कर पाटील,नक्षत्र प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा. रत्नमाला पाटील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडणे येथील प्राचार्या श्रीमती स्वाती पाटील मॅडम. अस्थिव्यंग दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती . शितल पाटील. निसर्ग दादा अहिरे,अक्षय पवार, आदी उपस्थित होते.
तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी व वृद्धाश्रमातील आजी -आजोबा दिव्यांग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते, परिसरात १०० देशी वृक्ष लागवडीचा संकल्प यावेळी वृक्ष मित्र शशिकांत भदाणे यांनी केला,

