
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. काळे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, संचालक उत्तम श्रावण पोमनर होते. समवेत पर्यवेक्षक डी. के. जगताप सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. प्रास्ताविक पी. एम. थोरे यांनी केले. नरेंद्र अहिरे यांनी मागील वर्षाचे पालक शिक्षक मेळाव्याचे इतिवृत्त वाचून दाखवले. यावेळी पालक संघाची नवीन कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली. संघाचे पदसिद्ध अध्यक्षपदी प्राचार्य व्ही. डी. काळे माध्यमिक कडील पालक संघाच्या उपाध्यक्षपदी रविंद्र जोशी व सचिव म्हणून नरेंद्र अहिरे यांची तर उच्च माध्यमिककडे उपाध्यक्षपदी अशोक दुकळे व सचिव म्हणून प्रा. अमोल अहिरे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

शिक्षकीय मनोगतात आर. जे. जाधव यांनी विद्यालयामार्फत वर्षभर राबविण्यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रम, जयंती महोत्सव, शैक्षणिक सहल आदींविषयी सविस्तर माहीती दिली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य काळे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीक विकासासाठी संस्था व सर्व शिक्षक प्रयत्नशील असल्याचे पालकांना आश्वासित केले. आभार प्रा. अमोल अहिरे यांनी मानलेत. राष्ट्रगीतने समारोप झाला. उपस्थितांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

