
साकोरा(प्रतिनिधी)- नांदगाव तालुका निसर्गमित्र समितीच्या वतीने आज शनिवार रोजी नांदगाव येथे एकुण १०१ झाडांचे आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदगाव डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर उदय मेघावत तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. सुनीलजी वाल्मीकराव तुसे सर संचालक (विवेक गोदावरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नांदगाव), नांदगाव डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव डॉ. हर्षद सुनीलराव तुसे, डॉ. गणेश चव्हाण डॉ. रवींद्र वाघ, डॉ. तेजस परदेशी, डॉ. प्रथमेश पाटील, डॉ. विवेक काकळीज, डॉ. संचिता गुप्ता, निसर्ग मित्र समिती तालुका अध्यक्ष प्राध्यापक धीरज परमार उपाध्यक्ष लीना तळेकर सदस्य हेमंत देवरे तळेकर सामाजिक वनिकरण नांदगाव विभागाचे शिंदे , एस. डी.चौधरी,यांच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गमित्र नांदगाव तालुका समितीच्या वतीने आता नांदगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला

. यावेळी साकोरा- मालेगाव रस्त्यावर देशी प्रजातीची एकुण १०१ झाडे आणि २० ट्री गार्ड लावण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुनीलजी तुसे यांनी निसर्ग समितीच्या या उपक्रमा बद्दल व सेवाभावी कार्याबद्दल अभिनंदन करीत समितीच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देत वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे नमुद केले. तसेच प्राणवायूचे काय महत्त्व देखील त्यांनी पटवून दिले तसेच उपस्थित प्रत्येक मान्यवरांनी एक झाड आईच्या नावाने लावून त्याचे पालकत्व स्वीकारावे असे आव्हान केले. समितीच्या सेवाभावी कार्याचे व तालुकाध्यक्ष धीरजकुमार परमार यांचे कौतुक करून समितीस नांदगावात सर्व परी वृक्ष लागवडीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम प्रास्ताविक वजा सुत्रसंचलन आश्रम शाळा प्राध्यापक धीरज परमार यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन लीना तळेकर यांनी केले.

