
सगर संस्थेचे छोट्या रोपट्यातून मोठ्या वृक्षात रूपांतर- माजी अध्यक्ष व माजी सेक्रेटरी श्री.किसन विठ्ठल लोणारे यांचे प्रतिपादन…
सिन्नर (प्रतिनिधी )दिनांक 24 जुलै 2026 रोजी आयोजित प्रतिमापूजनाने सुरुवात झालेल्या गुणगौरव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. इंग्रजी शाळेपेक्षा मराठी शाळा नेहमी सरस असतात.आज पर्यंत या शाळेतून घडलेले अनेक चांगले विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहे. याचा सर्वांनी अभिमान बाळगायला हवा.
आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांबद्दलही आपण नेहमी आदर ठेवावा,शाळेचा सुंदर परिसर आणि उच्च दर्जाचे शिक्षण हे वाखणण्याजोगे आहे .मातृभाषेतील शिक्षण कुठेही कमी पडत नाही त्यासाठी सर्वांनी आग्रह धरणे योग्य ठरेल असे आवाहन आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मंचावर उपस्थित त्यांच्या सुविद्य पत्नी,संस्थेच्या माजी संचालिका सौ. वत्सलाताई लोणारे व त्यांनी मिळून एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत संस्थेस 11 हजार रुपयांची देणगी दिली.
CSR समिती अध्यक्ष श्री.दत्तात्रय गोळेसर यांनी देखील संस्थेस 7 हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमासाठी उपस्थित दुसऱ्या अतिथी लोणारवाडी गावच्या सरपंच सौ. जयश्री सदाशिव लोणारे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार गुणपत्रिकेतील आकड्यांचा नसून पालक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फळ असते असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मधुकर देशमुख यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय लोंढे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी श्री. किसन विठ्ठल लोणारे,सौ.जयश्री सदाशिव लोणारे,संस्थेचे सेक्रेटरी श्री.नामदेव लोणारे, CSR समिती अध्यक्ष दत्तात्रय गोळेसर, संचालक श्री.सुधाकर गोळेसर,माजी संचालिका सौ वत्सलाताई लोणारे, शिक्षणाधिकारी श्री.राहुल वरंदळ, उच्च माध्यमिक विभाग उपप्राचार्य श्री.एकनाथ माळी, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.तुषार बलक,प्रभारी पर्यवेक्षिका सविता काठे,गुणवत्ता संवर्धन समिती अध्यक्ष श्रीम. रूपाली लोंढे,गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातून प्रथम दिक्षा लोणारे, द्वितीय अनुष्का वायचळे, तृतीय ईश्वरी लोंढे, चतुर्थ श्रावणी कांडेकर, पाचवी साधना लोणारे, मुलांमध्ये प्रथम यशराज झगडे आणि मागासवर्गीय प्रथम आचल जाधव यांचा त्यांच्या पालकां सहित यथोचित सत्कार करण्यात आला.
सौ.उल्का उत्तम भंदुरे यांचे कडून त्यांचे पिताश्री कै.आबासाहेब गणपत उबाळे यांच्या स्मरणार्थ 5 हजार रुपयांची FD तर श्री.विलास बाजीराव लोणारे त्यांच्याकडून 1100 रुपये
SSC गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून बक्षिस जाहीर करण्यात आले.
दुसऱ्यांच्या ताटात काय आहे यापेक्षा आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यावर आपण आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून यश संपादन करावे , आपले वडील हे आपले आधारस्तंभ असतात त्यांचे विचार नियमित डोळ्यासमोर असावे , सर्व देणगीदारांचे धन्यवाद देत अध्यक्षीय मनोगत संस्थेचे सेक्रेटरी श्री.नामदेव लोणारे यांनी व्यक्त केले .
प्रमुख पाहुण्यांच्या कार्याचा व उत्कृष्ट जीवनशैली बाबतचा परिचय क्रीडा प्रमुख श्री.किरण मिठे यांनी करून दिला.
या कार्यक्रम प्रसंगी पालक श्री.विलास लोणारे,श्री रामेश्वर झगडे,बाळासाहेब भगत, संदीप पगर,किरण लोंढे असे अनेक महिला पालक व शिक्षक उपस्थित होते .
उत्तम भाषा शैलीत देणगीदारांनी दिलेल्या रकमेचे व FD चे वाचन सूत्र संचलन दरम्यान सांस्कृतिक प्रमुख माधुरी वरंदळ यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रभारी पर्यवेक्षिका सौ.सविता काठे यांनी मानले.

