
भालूर ( प्रतिनिधी ) येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी चे आयोजन.
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय भालुर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यालयामध्ये वृक्षदिंडी आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू नाना आहेर सन्माननीय सदस्य विठ्ठल दादा आहेर , चांगदेव बाबा उगले सुखदेव ल हिरे, दीपक भाऊ गरुड तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पालखीचे पूजन केले .
यावेळी काही विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी अभंगही सादर केले.
यावेळी विठ्ठल नामाची गोडी लागली, पांडुरंग म्हणताय रुक्मिणीला,
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे अभंग सादर केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री मोरे सर, श्री गायकवाड सर, शेवाळे सर, सहारे सर, भरसटसर, श्रीमती शिनगारे मॅडम पवार मॅडम तसेच पाटील मॅडम
अभिनव बाल विकास मंदिर चे मुख्याध्यापक पाटील सर, चोळके सर तसेच श्रीमती खरोटे मॅडम दरेकर मॅडम, लहीरे मॅडम
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक माननीय श्री वैद्य सर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

