
मुळडोंगरी (ता. नांदगाव) : श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय, मुळडोंगरी येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
प्रथम क्रमांक अथर्व शांताराम मोरे गुण- २२२ द्वितीय क्रमांक रविना शिवाजी चव्हाण गुण-२२० तृतीय क्रमांक राशी वसंत राठोड गुण-२१० चतुर्थ क्रमांक शंकर आप्पा निकम गुण-१९२ यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या चिकाटी, मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यातही त्यांनी अशीच उत्तुंग यशाची शिखरे गाठावीत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या यशाबद्दल पालक व ग्रामस्थांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

