
नांदगाव, (. प्रतिनिधी )दि. २८ जुलै : जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल, नांदगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समाजामध्ये गुरुंचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास स्कूलचे प्राचार्य श्री. मनी चावला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. गुरुंच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळते, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी शिक्षकांचे औक्षण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
विद्यार्थ्यांनी गुरुंच्या गौरवासाठी भाषणे, कविता, समूह नृत्य आणि गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सुवर्णा आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी संस्कृती बोरसे व अनन्या आहेर यांनी केले. समारोपाच्या वेळी इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी आर्या पगार हिने उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल, सचिव श्री. विजय चोपडा, सहसचिव सौ. प्रमिलाताई कासलीवाल, श्री. सुशीलभाऊ कासलीवाल श्री. जुगलकिशोरजी अग्रवाल, श्री. महेंद्र चांदीवाल, श्री. रिखबचंद कासलीवाल, तसेच प्रशासन अधिकारी श्री. प्रकाश गुप्ता यांनी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

