
अंदरसुल (प्रतिनिधी ) नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री.ओमकार पवार साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ज्ञानयात्री सहल अनुभवण्याची संधी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा अंदरसुल मुली ता. येवला यांना मिळाली… ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवा द्वारे ज्ञानाची दारे उघडण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून चिरकाल स्मरणारे ज्ञान अनुभवायला मिळाले… आर्टिलरी म्युझियम व तारांगण या स्थानांना भेट दिल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाचे कामकाज अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना यावेळी मिळाली..
विध्यार्थ्यांना उत्सुकता असणारे मा.ओमकार पवार साहेब यांना भेटण्याचा आनंद मुलींना मिळाला यावेळी जिल्हा परिषद अंदरसुल मुली येथील मुलींनी साहेबांना वेगवेगळ्या भाषेतून संभाषण तसेच स्वतःची ओळख करून दिली यामध्ये जापनीज, रशियन, फ्रेंच, जर्मन अशा भाषा विद्यार्थ्यांकडून ऐकल्यानंतर साहेबांना विशेष आनंद व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक वाटले.… त्यानंतर विद्यार्थिनींनी साहेबांना वेगवेगळे प्रश्न इंग्रजी मधून विचारून त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस ज्ञानयात्री सहल दिल्ली यामधील सहभागी विद्यार्थ्यांनी श्रावणी शिणगारे हिने साहेबांविषयी तसेच दिल्ली सहलीबद्दल आपले इंग्रजी मनोगत व्यक्त केले.,
साहेबांना भेटल्यानंतर प्रत्येक मुलीला आयएएस होण्याचे बळ मिळाले व ते स्वप्न पाहण्याची इच्छा उत्पन्न झाली…
यावेळी विद्यार्थ्यांना माननीय Dy Ceo ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ मॅडम तसेच उपशिक्षणाधिकारी मा. श्री.सूर्यवंशी साहेब यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध कार्य व योजना समजावून सांगितल्या मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या…
यावेळी अंदरसूल मुली शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब बेरगळ, श्रीम. शिवाली सांगळे, श्रीम. जयश्री पालवे, श्रीम. मनीषा कंटाळे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री.विलास जानराव,श्रीम.किशोरी नाकोड,श्री.गोकुळदास गलांडे,श्रीम.रामेश्वरी क्षीरसागर यांनी प्रयत्न केले.

