
वेहळगाव.(प्रतिनिधी )माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, वेहेळगाव येथे संस्थेचे संचालक श्री टी. एम. डोंगरे सर यांच्या अध्यक्षतेखाली गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री थोरे सर उपस्थित होते. प्रारंभी विद्येची अधिष्ठात्री माता सरस्वती तसेच क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागरे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे पूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अनेक विद्यार्थ्यांनी गुरुंच्या मार्गदर्शनामुळे जीवनात मिळालेल्या प्रेरणेचे मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनीही गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि ज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले.
. 🌹विद्यालयाचे मुख्याध्यापक भाबड सर यांनी आपल्या मनोगतात गुरुचे स्थान विद्यार्थ्यांच्या जीवनात सर्वोच्च असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात श्री टी. एम. डोंगरे सर यांनी विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी सदैव श्रद्धा, स्नेह व आदरभाव जपावा, असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन केले.
. 🌹कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री ताडगे सर, नागरे सर, श्री बोरसे सर, श्री अनभुले सर व भाबड सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.🌹

