
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४७ वा दिवस

कोणाच्याही प्रवृत्ती उलटून टाकण्याचा, त्यात फेरफार करण्याचा कधी चुकून देखील प्रयत्न करू नका. त्याने गुरु आणि शिष्य या दोघांचीही पीछेहाट होते, हानी होत असते. जेव्हा तुम्ही ज्ञानमार्गाचा उपदेश द्याल तेव्हा तुम्ही ज्ञानमार्गीच बनवून गेले पाहिजे. शिष्याची जी भूमिका व अवस्था आहे तंतोतंत तीच भूमिका तुम्ही मनाने घेऊ शकला पाहिजे. हे जसे ज्ञानयोगाला तसेच इतर योगांनाही लागू आहे. प्रत्येक वृत्तीचा अशा रीतीने विकास करायला हवा की जणू तिच्या खेरीज आपल्या ठायी आणखी दुसरी कोणतीही वृत्तीच नाही. सर्व वृत्तीचा तथाकथित मिलाफ साधून त्याचा विकास करण्याची हीच गुरुकिल्ली होय. खरा गुरु तोच की आपल्या शिष्यांच्या प्रवृत्तीच्या व रुचीच्या अनुरोधाने आपली समस्त शक्ती प्रयुक्त करू शकतो. ज्याला शिकवावयाचे त्याच्याविषयी खरीखुरी सहानुभूती असल्याखेरीज आपण कधीच कुणाला नीटपणे शिकवू शकणार नाही.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ८ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. ३० जुलै २०२६
★ १६२२ संत तुलसीदास यांचा स्मृतीदिन.
★ १९६० कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा स्मृतिदिन
★ १९८३ शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचा स्मृतिदिन
★ १९९५ अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा स्मृतीदिन.

