
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी ):- घोटी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पगारे होते.व्यासपीठावर निवृत्ती सरगर,सोमनाथ गिरी, रमेश देवगिरे,वंदना जाधव,वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे, अनिल गोवर्धने आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्वांचे औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपशिक्षक सोमनाथ गिरी यांच्यासह साक्षी गव्हाणे, भाग्यश्री गव्हाणे या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचा महिमा सांगितला.विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प व भेटवस्तू देवून शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचा गौरव केला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रविंद्र पगारे म्हणाले की, जीवनात गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांनी गुरु शिष्य परंपरा तसेच गुरू-शिष्यच्या पवित्र नात्याविषयीचे महत्त्व माहिती दिली.

विद्यार्थ्यांमध्ये त्याग व समर्पण ही भावना असते. विद्यार्थ्यांनी गुरूपासुन प्रेरणा घ्यावी. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा तसेच मोबाईल पासून दूर राहावे असे आव्हान त्यांनी श्री. पगारे सर यांनी केले. वर्गशिक्षिका चारुशीला तागडे मार्गदर्शनाखाली इयत्ता-१० वी तु-फ च्या वर्गाने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. सूत्रसंचालन कुमारी सृष्टी गव्हाणे हिने तर आभार आदिती गव्हाणे हिने मानले.यावेळी गायत्री सूर्यवंशी, अनिता राठोड, मनिषा सोनवणे, तृप्ती थोरात, प्रिता धारणकर,श्रीम.व्ही. टी. शिंदे,रुपाली चौधरी, सुधीर काळे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

