
मा. मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान फरहान दादा खान युवा शिवसेना जिल्हा प्रमुख ,गणेश धात्रक सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक 30/07/2026 रोजी नांदगाव तालुक्यात सावता कंपाऊंड नांदगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे आयोजित करणेत आले होते.
सदर शिबिरास सागर हिरे नगराध्यक्ष नांदगाव नगरपरिषद, योगेश पाटील नगराध्यक्ष मनमाड नगर परिषद, विद्या कसबे नगरसेवक नांदगाव, दत्तात्रय छाचड नगरसेवक , नांदगाव व मनमाड नगरपालिकेतील सर्व नगरसेवक , नांदगाव व मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ , बाबासाहेब गाढवे उपविभागीय अधिकारी येवला,सुनील सौंदाणे तहसीलदार नांदगाव व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख, पत्रकार तसेच गनांदगाव मतदारसंघ मधील लाभार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
18 विभागांचे एकूण 25 स्टॉल लावण्यात आलेले होते

सदर शिबीरामध्ये पुढीलप्रमाणे सेवा देण्यात आलेल्या आहेत.
- सामाजिक वनीकरण नांदगाव यांचेमार्फत रोपे वाटप
- महिला व बाल विकास विभाग मार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, मातृ वंदन योजना, बेबी केअर किट, बाल संगोपन योजना
- तहसिल कार्यालयामार्फत संजय गांधी योजना, श्रावणबाळ, पुरवठा विभाग शिधापत्रिकेवरील कमी नाव करणे, नाव वाढविणे, नवीन अंत्योदय शिधापत्रिका वाटप, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, विविध प्रकारचे दाखले तसेच 7/12, आठ-अ, फेरफार, कुंभार समाजाला ओळखपत्र वाटप
- भूमि अभिलेख विभागामार्फत गटनकाशा, मालमत्ता कार्ड, सनद वाटप
- नगरपंचायत मार्फत जन्म व मृत्यु दाखले, बचत गट बँक लिंकेज योजना, पी.स्व.निधी योजना, असेंसमेंट उतारा
- आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड, वय वंदन कार्ड, आरोग्य तपासनी शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करणेत आले
- कृषि विभागामार्फत पीएम किसान लाभार्थी, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना,नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत वाटप
- पंचायत समिती मार्फत,घरकुल लाभार्थी जन्म व मृत्यु दाखले वाटप करण्यात आले.
- मुद्रांक व शुल्क विभागाद्वारे रक्त नात्यातील बक्षीस पत्र योजनेअंतर्गत वाटप, व मूळ दस्त परत करणे
- वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव यांच्यामार्फत पशुधन नुकसान व पीक नुकसान बाबत वाटप
- पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग नांदगाव यांच्यामार्फत कालवड पार्टी यांचा विमा उतरवणे कालवड पार्टी यांना पशुखाद्य पुरवठा करणे तसेच जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी वैरण बियाणे वाटप
मतदारसंघातील एकूण 2700 लाभार्थी शिबिरस उपस्थित होते ह्यांना महसूल व इतर शासकीय विभागामार्फत विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला

