
येवला प्रतिनिधी (दिपक उंडे)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत संत भगवानबाबा उसतोड कामगार मुलीचे शासकीय वसतिगृह बाभुळगाव ता.येवला जि.नाशिक या शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात एकुण 100 रिक्त असणा-या जागेवर वसतिगृहामध्ये प्रवेश देणे सुरू करण्यात आलेले आहे. तरी माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदविका, तांत्रिक अभ्यासक्रम, सर्व प्रकारच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या ग्रामीण भागातील होतकरू व गुणवत्ताधारक इच्छुक विदयार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे प्रभारी अधिक्षक श्रीम .हिरे मॅडम यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वसतिगृह प्रवेशासाठी अर्जासोबत वडिलांचे उसतोड कामगार प्रमाणपत्र/ओळखपत्र (ग्रामसेवक यांचे), विदयार्थ्याचे दोन पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड प्रत, बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती, मागील वर्षाचे गुणपत्रक, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, सन 2025-26 चा पालकाचा उत्पन्नाचा दाखला (तहसिल कार्यालयाकडील), दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास), अनाथ प्रमाणपत्र (असल्यास), गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास) व रेशनकार्ड प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

