
मनमाड (प्रतिनिधी )मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे 2026 मध्येआयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत छत्रे हायस्कूलचा कु. सक्षम मनिलाल जगताप ➖प्रथम तर कथाकथन स्पर्धेत सेंट झेविअर्स हायस्कूलचा कु. कृष्णा विजय मोहिते ➖प्रथम व निबंध स्पर्धेत, मोठया गटात म. रे. मा.विद्यालयाची कु. धनश्री दिलीप शिवदे ➖ प्रथम तर लहान गटात प्रकृती स्कूलची कु. आर्या प्रविण पाटील ➖ प्रथम➖ पारितोषिक विजेते ठरले

मनमाड – मनमाड शहाराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन वाचन चळवळीत 112 वर्षाची शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने लोकशाहीर स्व.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त गेल्या 58 वर्षा पेक्षा जास्त काळा पासून मनमाड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयात लेखन, करण्याची गोडी लागावी म्हणून मनमाड शहरात या आंतरशालेय निबंध /कथाकथन/ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते

. नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात वाचनालय तर्फे अशा प्रकारची एकमेव स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही हिच परंपरा कायम टिकवत यंदाही वाचनालयातर्फे शुक्रवार दि.31 जुलै 2026 रोजी आंतर शालेय कथाकथन तर शनिवार दिनांक 01ऑगस्ट 2026 रोजी आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा सीता लक्ष्मी हॉल, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या व्यासपीठवर प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम कवी, लेखक,गीतकार, चित्रकार सन्माननीय विष्णूजी थोरे तसेच शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, वाचनालय चे माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक सर्व सन्माननीय सौ. वैष्णवी विजय पुरंदरे, सौ. चंद्रभागा सटवाजी शिनगारे, सौ. स्वाती संजय राक्षे तसेच निबंध स्पर्धा परीक्षक रमाकांत यशवंत मंत्री,अक्षय सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती, स्व.लोकमान्य टिळक, स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत द्विप प्रज्वलन करून या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.सर्व मान्यवर व परीक्षकांचा ग्रंथभेट श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सोशल मीडियाच्या अत्यंत कठीण काळातही शालेय विद्यार्थ्यांना वक्तृत्व व लेखनाचे,वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थी, शिक्षक,पालक यासर्वांना च्या सहकार्याने वाचनालय ला नियमित पणे दरवर्षी या स्पर्धेचा उपक्रम करणे शक्य होते असे सांगितले. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या विविध आगामी उपक्रमाची माहिती देत सचिव कल्पेश बेदमुथा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी केले तर परिक्षकांतर्फे सौ वैष्णवी पुरंदरे, रमाकांत मंत्री यांनी मार्गदर्शनपर मनोगता मध्ये विध्यार्थी /पालक /शिक्षक यांना महत्वपूर्ण सूचना केल्या तर मनमाड सार्वजनिक वाचनालय हे वाचनचा सांस्कृतिक वारसा जपत अशा आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करुन शालेय विद्यार्थ्यांन साठी वाचन लेखन आणि वक्तृत्व चे व्यासपीठ उपलब्ध करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणारा उपक्रम गेल्या सहा दशकांपासून करीत आहे हे कौतुकास्पद आहे यातूनच पुढे देशाचे जबाबदार नागरिक घडतील या स्पर्धा एक उत्तम व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा सराव आहेत असे आपल्या प्रमुख अतिथी कवी विष्णू थोरे यांनी शुभेच्छा पर मनोगत मध्ये व्यक्त केले प्रमुख अतिथी यांच्या हस्ते खालील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुस्तक स्वरुपात बक्षिस वितरण करण्यात आले.

मनमाड सार्वजनिक वाचनालय – आंतर शालेय निबंध स्पर्धा ➖मोठा गट (इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी ➖अंतिम निकाल ➖1) प्रथम पारितोषिक ➖कु. धनश्री दिलीप शिवदे (म.रे. मा. विद्यालय ) 2)द्वितीय पारितोषिक ➖कु.रिया गोकुळ हिरे ( छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 3) तृतीय पारितोषिक ➖कु. महिमा मनोज पवार (श्री गुरुगोविंदसिंग हायस्कूल ) 4)प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.स्वामीनी हेमंत कातकडे (सेंट झेंवियर्स हायस्कूल ) 5)द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.अलबिना सैयअलद शेख (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 6)तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.रामेश्वरी गणेश भागरे (संत बार्णाबा हायस्कूल ) 7)चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक- कु.रिद्धी अशोक आहिरे (म. रे. मा. विद्यालय) 8)पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक कु. एंजल ऍंथोनी लालझरे (संत बार्णाबा हायस्कूल ) आंतर शालेय निबंध स्पर्धा लहान गट (इयत्ता 05 ते इयत्ता 08 वी ) अंतिम निकाल 1)प्रथम पारितोषिक➖कु. आर्या प्रविण पाटील ( प्रकृती स्कूल )2)द्वितीय पारितोषिक ➖कु.श्रेया प्रविण आहिरे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 3) तृतीय पारितोषिक ➖कु.पूर्वी विशाल राजोळे (सरस्वती विद्यालय ) 4) प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. आभा अमोल गुजराथी (प्रकृती स्कूल ) 5)द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.रितिका रविंद्र आहेर (सेंट झेवियर्स हायस्कूल ) 6)तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. प्रिया किरण हिरे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल )7) चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.साक्षी संतोष सरोदे (श्री गुरु गोविंदसिंग हायस्कूल ) 8)पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. रिहीत सम्यक लोढा (प्रकृती स्कूल )आंतर शालेय कथाकथन स्पर्धाअंतिम निकाल 1)प्रथम पारितोषिक ➖कृष्णा विजय मोहिते (सेंट झेविअर्स हायस्कूल ) 2)द्वितीय पारितोषिक ➖कु.कृतिका नाना कारंडे ( सेंट झेविअर्स हायस्कूल ) 3) तृतीय पारितोषिक ➖कु.श्लोक अरविंद तिरुख ( सेंट झेविअर्स हायस्कूल ) 4)प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.जान्हवी अमोल शिंदे (सरस्वती विद्यालय ) 5) द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. नितीशा अनिल म्हसदे (के. आर. टी. विद्यालय ) 6) तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.भाग्यश्री संदीप पवार (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 7)चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. वेदांत शिवम मेहेत्रे (के. आर. टी. विद्यालय ) 8) पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.जागृती बाळू खताळ (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल )आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा अंतिम निकाल 1) प्रथम पारितोषिक ➖कु.सक्षम मनिलाल जगताप (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 2)द्वितीय पारितोषिक ➖कु.भाग्यश्री संदीप पवार (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल )3) तृतीय पारितोषिक ➖कु. वैष्णवी योगेश दराडे (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 4)प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. अनुष्का प्रफुल्ल निरभवणे(म. रे.मा.विद्यालय ) 5) द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖ कु.समर्थ दिपक राउतराये (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) 6) तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु.रिद्धी अशोक आहिरे (म. रे. मा. विद्यालय )7) चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक ➖कु. स्वामीनी हेमंत कातकडे (सेंट झेवीयर्स हायस्कूल )8) पाचवे उत्तेजनार्थ पारितोषिक ➖ कु सायली सुनील घुसळे ( संत बार्णाबा हायस्कूल )तर या सर्व स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या 1000 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना वाचनालय तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, आंतरशालेय निबंध स्पर्धेत या निबंध मनमाड शहरातील सुमारे 18 माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेत 1000 तर कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अक्षय सानप ,ऍड संजय गांधी अभिषेक पितृभक्त ,राहुल लांबोळे,,हर्षद गद्रे सर,चेतन सुतार दिनेश धारवाडकर ,संदीप देशपांडे, मुकेश मिसर, हेमंत वाले सर सदाशिव सुतार , मंगेश वाणी, वसंत खंबाईतसर,सौ योगिता देशपांडे, प्रकाश धामणस्कर रवींद्र पाटील, यांचे विशेष सहकार्य या स्पर्धा उपक्रम कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पर भेट दिली या कार्यक्रमला मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ.संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवरांन सह मोठ्या संख्येने पालक, शिक्षक व विद्यार्थीवर्ग, वाचक उपस्थित होता. कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे,सचिव कल्पेश बेदमुथा आणि संचालक मंडळ ने केले

