
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५२ वा दिवस

सत्याचे स्वरूपच असे असते की जो कोणी त्याला एकदा पाहतो त्याचा त्यावर विश्वास बसतो. सूर्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हातात मशाल घेऊन ते दाखवण्याची आवश्यकता भासत नाही, तो स्वतःच प्रकाशमान आहे. जर सत्याला पुराव्याची आवश्यकता पडत असेल तर मग त्या पुराव्यांना कसे सिद्ध करणार? सत्याला सिद्ध करण्यासाठी कशाची साक्ष लागत असेल तर त्यासाठी मग आणखी कशाची साक्ष काढणार? ज्यांनी सत्याचा स्वीकार केला आहे, त्यांना सत्य समजून घेण्यासाठी न्याय, युक्ती, तर्क-वितर्क किंवा बौद्धिक व्यायामाची गरज राहत नाही. त्याच्यासाठी सत्याचे जीवन प्रत्यक्षाहून प्रत्यक्ष होते.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १३ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२६
★ १७३० पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील मराठ्यांचे सरसेनापती सदाशिवराव भाऊंचा जन्मदिन.
★ १८४५ स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, कायदेपंडित, राजकीय नेते, उत्तम प्रशासक, काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्मदिन.
★ १८९४ प्रसिध्द साहित्यिक, वक्ते नारायण सिताराम तथा ना. सी. फडके जन्मदिन.
★ १९२९ पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार, पटकथालेखक, विनोदी अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्मदिन.

