
:पार्श्वगायक किशोर कुमार जयंती निमित्त प्रतिमा पूजन करतांना विरंगुळा जेष्ठ नागरिक सिंगर गृपचे सदस्य व साधना वाचनालयाचे पदाधिकारी.
मालेगाव (प्रतिनिधी- येथील विरंगुळा जेष्ठ नागरिक सिंगर गृपच्या वतीने हरहुन्नरी कलाकार व सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर येथील साधना वाचनालयात संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सुरांमधून अजरामर किशोर कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली.
मनोज जैन यांनी ‘आते जाते खुबसुरत आवारा’, ‘प्यार दिवाना होता है, संस्थांना होता है’, ‘रोते हुवे आते है सब’, ज्योतीकुमार ब्राम्हणकर यांनी ‘रिमझिम गिरे सावन’, ‘आने वाला पल जाने वाला है’ आणि ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना’ ही गीते सादर केली. कमलकिशोर झंवर यांनी ‘निले निले अंबर पर चांद’, ‘खिलते हैं गुल यहाँ खिलके बिखरने को’, प्रकाश कांकरिया यांनी ‘भवरे की गुंजन हैं मेरा दिल’, व ‘पल पल दिल के पास’ तर दिनेश गीते यांनी ‘मुसाफिर हूं यारो ना घर है ना ठिकाणा: व ‘जिंदगी का सफर है ये कैसा सफर’ ही सुरेल गाणी सादर केली.

या मैफलीचे बहारदार सूत्रसंचालन रविराज सोनार यांनी केले. प्रकाश कांकरिया यांनी आभार मानले. सुरवातीला साधना वाचनालयाचे अध्यक्ष विलास वडगे, संस्थापक- सचिव अशोक पठाडे, सुधाकर बागूल, साधना सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष राजीव वडगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी मामको बॅंकेचे व्यवस्थापक किरण शाह, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एल. पी. भालेराव, सुरेंद्र टिपरे, भास्कर वाणी, जितेंद्र चव्हाण, संजय निकम, अरुण सुर्यवंशी, नारायण अहिरे, नचिकेत कोळपकर, नरेश जगताप, प्रभाकर वारुळे, नंदू सुर्यवंशी, जितेंद्र देसले, वसंत पुरकर आदींसह रसिक उपस्थित होते.

