
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३५३ वा दिवस

सारी परिस्थिती अनुकूल असतांना मोठे पद मिळाल्यावर तर कोणीही मोठा होऊ शकतो! एखादा भित्रा मनुष्य देखील रंगमंचाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रकाशात वीर बनतो. जग सारखे बघत आहे मग कुणाचे हृदय स्पंदित होणार नाही? आपले कार्य शक्य तितक्या चांगल्या रीतीने करेपर्यंत कुणाची नाडी जोराने चालणार नाही? पण मला खरा थोरपणा तर त्या किड्यातच दिसत आहे की जो आपले कर्तव्य प्रतिक्षणी शांतपणे, निश्चयपूर्वक पार पाडीत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जो संयमाने, निष्ठेने, नियमितपणे, सातत्यपूर्णपणे कार्य करतो व स्वतःचे नेतृत्व सिध्द करतो. तोच खरा नायक ठरतो.
*स्वामी विवेकानंद...*

डाॅ.डी.वाय.पाटील भावपूर्ण श्रद्धांजली
आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण १४ शके १९४८
★ आषाढ वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२६
★ १८९० इतिहासकार, लेखक, वक्ते, मराठी शुध्दलेखन महामंडळाचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांचा जन्मदिन.
★ १९९२ स्वातंत्र्यसैनिक, सन १९४२ च्या आंदोलनातील अग्रणी नेते, तत्त्वचिंतक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय समाजवादी पक्षाचे संस्थापक अच्युतराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

