
नाशिक ( प्रतिनिधी)- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा नाशिक शहर संचालक ॲड.लक्ष्मणराव लांडगे तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अशोक वरखेडे,यादवराव शिंदे,सुनील निरगुडे,जगन्नाथ तिदमे,निलम सोनवणे,अशोक जाधव,एकनाथ भुसारे,स्वाती चव्हाण,गुलाबराव भामरे तसेच गुरुदास पाटील,गणपत पोटे (माजी मुख्याध्यापक),शंकर कोतवाल (माजी मुख्याध्यापक),माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रा.डाॅ.एस.एम.चौधरी त्याचबरोबर मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात पर्यवेक्षक देविदास भारती,विजय पवार व प्रताप काळे उपस्थित होते.

एनसीसी आर्मी सार्जेट हितेश हांडगे याने संचलन केले व एनसीसी ऑर्डर दिल्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे शहर संचालक ॲड.लक्ष्मणराव लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.या कार्यक्रमाप्रसंगी वंदे मातरम,राष्ट्रगीत,राज्यगीत,ध्वजगीत तसेच देशभक्तीपर गीते विद्यालयातील संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांच्या गीत मंचाने सादर केली.या गीतांनी सर्व वातावरण देशभक्तीमय झाले होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.या शुभ दिवशी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला

.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते वेगवेगळ्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यालयात 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव लांडगे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या व आपल्या शुभ संदेशात ते म्हणाले स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात आपल्या देशात साजरा केला जातो.भारतातील हा एक राष्ट्रीय सण आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात,अज्ञात व्यक्तींची कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.या दिवसाचे विशेष महत्त्व जाणून देशभरात विविध सामाजिक ऐतिहासिक उपक्रम राबवण्यात येतात.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीने आजचा हा स्वातंत्र्य दिन अतिशय अविस्मरणीय ठरला.या कार्यक्रमाप्रसंगी एनसीसी नेव्हल व आर्मी तसेच स्काऊट गाईड ,आर एस पी हे सर्व विद्यार्थी देखील आपल्या गणवेशात उपस्थित होते.
सूत्रसंचालन जेष्ठ क्रीडा शिक्षिका मंगल शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक सांस्कृतिक समिती व समितीतील सर्व सदस्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

