
नाशिक (प्रतिनिधी)महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे संस्थेच्या सन २०२६-३१ या कालावधी साठी विश्वस्त मंडळाची नेमणूक आज झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत करण्यात आली. पुणे जिल्ह्याबाहेरील विश्वस्त म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड चे उपाध्यक्ष ॲड. सुदाम हरिभाऊ सातभाई यांची एकमुखाने निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीत, सातभाई यांचे साहित्य परिषदेचे कार्य नाशिक मध्ये रुजविण्याचे योगदान, एका बहुराष्ट्रीय कंपनीतील लेखा विभागाचे सहा. व्यवस्थापक आणि विधीज्ञ म्हणून अनुभव या बाजू जमेच्या ठरल्या. सभेस प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन आणि नाशिक जिल्हा प्रमुख उन्मेष गायधनी यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सातभाई यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.

