लेखक:- रविराज सोनार

“मन पाखरू, पाखरू, त्याची काय सांगू मातआता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात”धरत्रीच्या आरशामधून स्वर्ग पाहणारी कवयित्री, अहिराणी-मराठी साहित्यातील बावनकशी सोनं ‘बहिणाबाई नथुजी चौधरी’ यांचा आज जन्मदिवस. लहानपणी शाळेत बहिणाबाई यांच्या कविता आम्हाला होत्या…खरचं पुन्हा पुन्हा या कविता वाचाव्यात आणि पुन्हा पुन्हा लहानपण जगावं असं वाटते. या कविता वाचताना किंवा ऐकताना मराठीचे शिक्षक, शाळा, बालमित्र, सर्व सर्व एका क्षणात जिवंत होतात. अशा या बहिणाबाई मानवी मनाचे वर्णन करताना म्हणतात, ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर’ तर संसाराचं स्वरुप सांगताना-अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।याची जाणीव करून देतात.बहिणाबाईंचे सुरेख वर्णन पुलंनी केलंय. ते म्हणतात-“सख्ख्या आईप्रमाणे, तिने आमची आयुष्ये समृद्ध केली.”त्या अशिक्षित माऊलीकडे सगळ्या जगभराचे शहाणपण भरले होते.बिना कपाशीने उले, त्याले बोंड म्हनु नये,हरिनामाविना बोले त्याले तोंड म्हनू नये !!नाही वार्याने हाललं त्याले पान म्हनू नये,नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हनू नये !!या चार ओळी वाचल्यावर, ऐकल्यावर, अंगी भिनवल्यावर मला सांगा काय गरज आहे कुठल्या मंदीरात जाण्याची, कुणा गुरुचे शिष्यत्व घेण्याची. त्या जगावेगळ्या माईसाठी देवत्वाचे निकषच वेगळे होते. तिच्या लेखी देव केवळ मंदीरात नव्हता तर तो चराचरामध्ये सामावला होता.-पु. ल. देशपांडे एक अडाणी, अशिक्षीत स्त्री, जिला शिक्षणाचा अजिबात गंध नाही, जिने कधी शाळेचं तोंड पाहिलेलं नाही पण जिने आपल्या कविता आणि ओव्यांच्या माध्यमातून मानवी जीवनच नव्हे तर निसर्गाच्या विविध अंगांचे कंगोरे आमच्या समोर उलगडलेत त्या आमच्या माय सरसोतीला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.- रविराज सोनार #शब्द_क्षितिज

