
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७२ वा दिवस*

ज्ञानयोग्याचे या जीवनातील अंतिम ध्येय जीवन्मुक्त होणे हेच असते. जो या जगात अनासक्त होऊन राहू शकतो तोच जीवन्मुक्त होय. तो पाण्यात वाढणाऱ्या कमलपन्नासारखा असतो; ही पाने पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाहीत; तद्वत् हा माणूस जगात राहूनही जगाने लिप्त होत नाही. हा माणूस केवळ सर्व मानवांहूनच नव्हे, तर सर्व प्राण्यांहूनही श्रेष्ठ असतो, कारण त्याला त्या निरपेक्ष सत्तेशी आपल्या ऐक्याचा साक्षात्कार झालेला असतो, त्याला ‘मी ईश्वराशी एकरूप आहे’ ही अनुभूती झालेली असते.
*स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास २ शके १९४८*
★ श्रावण शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२६ ★ द्वितीय श्रावण सोमवार शिवमुठ – तीळ ★ १८८० शेतीकाम घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ओव्या रचून कविता करणाऱ्या कवयित्री, निरक्षर असूनही जिवंत काव्यरचनेची प्रतिभा असलेल्या खान्देश रत्न बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिन
.★ १८८८ मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचा जन्मदिन.
★ १९०८ थोर क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरु यांचा जन्मदिन
.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*

