
फ्रवशी टाऊन अकॅडमी , नाशिक येथे दिनांक ५ व ६ ऑक्टोंबर रोजी संपन्न झालेल्या १४ ,१७ व १९ वर्षांखालील मुले-मुली रग्बी फुटबॉलच्या विभागीय सामन्यांचे उद्घाटन नाशिक विभागाचे शिक्षक आमदार मा.किशोरभाऊ दराडे यांचे शुभहस्ते करण्यात आले, प्रमुख अतिथी म्हणून रग्बी असोसिएशन चे अध्यक्ष संजय चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय होळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी आणि कबड्डीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू सहाय्यक क्रीडा अधिकारी अक्षय शिंदे, माजी मुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी , डायरेक्टर ऑपरेशन प्रभाकर मुसळे यांच्यासह रग्बी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
विभागीय स्पर्धा उद्घाटनाच्या प्रसंगी आमदार किशोर दराडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल पण फिटनेस वाढवा.. कारण आयुष्यामध्ये निरोगी शरीर हीच खरी संपत्ती असून आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे शारीरिक सामर्थ्य आहे ते महत्वाचे असते असा मोलाचा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला.

विभागीय रग्बी स्पर्धेसाठी नाशिकसह धुळे ,जळगाव, नंदुरबार या जिल्ह्याचे मुला- मुलींचे संघ सहभागी झाले होते. उद्घाटन प्रसंगी विशेष कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे , महाराष्ट्र व गोवा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कवितांचा समावेश झाल्याबद्दल कवी राजेंद्र सोमवंशी , विशेष सहकार्याबद्दल डायरेक्टर ऑपरेशन प्रभाकर मुसळे यांचेसह उपस्थित संघ व्यवस्थापक व पंच यांचा सन्मान मा.आमदार किशोर भाऊ दराडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी क्रीडापिठावर शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर वाघ, सरचिटणीस विनोद हिरे, शहराध्यक्ष योगेश रोकडे,उपाध्यक्ष योगेश मोजाड , सरचिटणीस मनोज कनोजीया, कोषाध्यक्ष राम धोंगडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चे सदस्य अर्जुन टिळे , पोलिस उपनिरीक्षक सुनील कनोजीया, फ्रवशी टाउन चे डायरेक्टर ऑपरेशन प्रभाकर मुसळे यांच्या हस्ते करण्यात आला.

स्पर्धेचा अंतिम निकाल
(१४ वर्षाआतील मुले)
प्रथम -असिमा बाल शैक्षणिक केंद्र आवळखेड , नाशिक
द्वितीय- एस ए मिशन हायस्कूल व जुनिअर कॉलेज, नंदुरबार
तृतीय- हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोंडाईचा, (धुळे ग्रामीण )
(१४ वर्षाआतील मुली)
प्रथम- असिमा बाल शैक्षणिक केंद्र आवळखेड, नाशिक
द्वितीय- साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाशिक रोड
तृतीय- श्रीमती .एच.जी. श्रॉफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार
(१७ वर्षाआतील मुले)
प्रथम-नूतन विद्यामंदिर, देवळाली कॅम्प नाशिक ग्रामीण
द्वितीय-एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार
तृतीय -फ्रवशी टाऊन अकॅडमी, (नाशिक मनपा)
(१७ वर्षाआतील मुली)
प्रथम -नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प (नाशिक ग्रामीण)
द्वितीय- रा.आ.महाजन माध्यमिक विद्यालय हिवरखेडे बु|| (जळगाव ग्रामीण)
तृतीय-श्रीमती .एच.जी. श्रॉफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार
(१९ वर्षाआतील मुले )
प्रथम- नूतन विद्या मंदिर, देवळाली कॅम्प (नाशिक ग्रामीण)
द्वितीय – मिशन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार
तृतीय -श्री स्वामी समर्थ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, धुळे
(१९ वर्षा आतील मुली)
प्रथम- नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प (नाशिक ग्रामीण)
द्वितीय- हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दोंडाईचा ,धुळे तृतीय- मिशन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज , नंदुरबार

