
नाशिक| मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूल नाशिक मध्ये कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे व जेष्ठ शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम इयत्ता दहावी क या वर्गाने सादर केला.विद्यार्थी मनोगत प्रसाद सरदेसाई तर शिक्षक मनोगतातुन रुपाली ठाकरे यांनी डॉक्टर वसंतराव पवार यांचे शैक्षणिक कार्य सांगितले.अध्यक्षीय मनोगतातुन ज्ञानेश्वर शिंदे यांनी एक शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ मध्ये जन्म घेतलेली व्यक्तीमत्व अभ्यासातिल असणारी हुशारी मुळे पुणे,नाशिक या ठिकाणी आपले शिक्षण त्यांनी पुर्ण करुन अनेक सामाजिक व राजकीय कार्यात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला. मविप्र संस्थेचे सरचिटणीस पदावरती काम करत असताना शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून आपले कार्य त्यांनी पुर्ण केले.सलग १३ वर्षे अतिशय कल्पकतेने व सेवाभावी वृत्तीने संस्थेचे कार्य त्यांनी केले हे सांगितले. कार्यक्रमाचे फलक लेखन रुपाली ठाकरे यांनी तर सुत्रसंचालन स्नेहल गुंजाळ,गौरी देशमुख यांनी तर आभार भाग्यश्री पवार हिने मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.

