
वासोळ:- इंदिरा माध्यमिक विद्यालयात कै.कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांचा स्मृतिदिन साजरा करतांना…
वासोळ:-(प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात दि.७ आक्टोबर रोजी कै. कर्मवीर डाॅ.वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिना निमित् प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. केदार एस एस होते. याप्रसंगी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.श्री.निकम एस.के. श्री.सावंत व्ही.बी.श्री.चौधरी आर.एस श्री.आहेर एस.सी. यांनी विद्यार्थ्यांना कै. डाॅ. वसंतराव पवार यांच्या विषयी माहीती सांगितली. तसेच अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. केदार सर यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहीती सांगितली.कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन श्री.आहेर सर व आभार प्रदर्शन श्री.सावंत सर श्री.चौधरी सर यांनी केले.

