
साधना वाचनालय, संगमेश्वर, मालेगाव यांना ग्रंथ भेट प्रसंगी वाचनालय पदाधिकारी व रविराज सोनार.
मालेगाव (प्रतिनिधी)- येथील राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ सैनिक, साहित्यिक व सेवानिवृत्त प्राध्यापक व्ही. सी. सोनार यांचे स्मरणार्थ पितृपक्षानिमित्ताने संगमेश्वर येथील साधना वाचनालयात ग्रंथभेट देण्यात आली.
गेल्या वर्षी प्रा. सोनार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते, त्यांच्या इच्छेनुसार मृत्यू पश्चात कोणतेही विधी करण्यात आले नव्हते, परंतु ते पुरोगामी व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते असल्याने त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ ग्रंथ साधना वाचनालयास त्यांचे चिरंजीव पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रविराज सोनार यांनी भेट दिले. वाचनालयाचे अध्यक्ष विलास वडगे, सहसेक्रेटरी किशोर मोरे संचालक सुधाकर बागूल, साधना सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष राजीव वडगे यांनी भेट स्वीकारली. यावेळी वाचनालय कर्मचारी श्रीमती पूनम बागुल, नंदलाल सूर्यवंशी,राहुल शिरसाठ, भारती पाटील आदी उपस्थित होते.
ग्रंथ रुपी चांगली भेट वाचकांना निच्चीतच कायम स्वरूपी उपयुक्त होईल असे प्रतिपादन करून वाचनालयाचे अध्यक्ष विलास वडगे यांनी सोनार परिवाराचे आभार मानले.

