
मनमाड (वार्ताहर)-कै. बाबुलाल देवचंद पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सारताळे (साकोरा)येथे आज लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आणि मा. पंकज भाऊ खताळ पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रम शाळा विद्यार्थी डोळे तपासणी व मुलीं साठी मासिक पाळी व्यवस्थापण शिबीर घेण्यात आले.सदर शिबिरात डॉ. यादव यांनी आश्रम शाळा विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांचे डोळे तपासणी करून मार्गदर्शन केले तर डॉ. अर्चना राठी यांनी आश्रम शाळेतील मुलींशी चर्चा करीत मासिक पाळी व्यवस्थापण व मुलींच्या आरोग्याशी निगडित विविध समस्यांवर समुपदेशन केले.विद्यार्थी सृजनशिलतेला वाव मिळावा म्हणुन चित्रकला स्पर्धा ही घेण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था कोषाध्यक्षा नम्रता पगार मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थिती लायन्स क्लब मनमाड अध्यक्ष सुचिता खताळ, संस्थापक माजी अध्यक्ष ऍड. शशिकांत व्यवहारे,खजिनदार मनिषा अग्रवाल, उपाध्यक्ष रेखा येणारे,डॉ. अर्चना राठी, डॉ.अजित यादव,प्राचार्य समाधान चौधरी, अधिक्षक रविंद्र पाटील अधिक्षिका आशा बोरसे प्रमिला गायकवाड, प्रज्ञा जोगदंड, शिसम यादव, हेमंत कातकाडे, ला.रौनदळ, सुजल खताळ इत्यादी उपस्थित होते. सदर शिबीर प्रसंगी ऍड. शशिकांत व्यवहारे यांनी लायन्स क्लबच्या कामकाजाची माहिती दिली तर लायन्स क्लब मनमाड

अध्यक्षा सुचिता खताळ यांनी लायन्स क्लब मनमाडच्या वतीने राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.अध्यक्षीय मनोगतात नम्रता पगार मॅडम यांनी लायन्स क्लबच्या सेवाभावी कामाचे कौतुक करीत सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले.कार्यक्रम प्रास्ताविक प्राचार्य समाधान चौधरी यांनी मांडले तर सूत्रसंचालन दिपक सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास सर्व आश्रम शाळा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


