
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४१७ वा दिवस

आपण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलो आहोत असा आत्मविश्वास प्रत्येकात असला पाहिजे. तुम्ही कमकुवत आहात, दुर्बल आहात, तुम्ही काहीच करू शकणार नाही. असे तुम्हाला नेहमी शिकविण्यात आले. त्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस कूचकामाचे बनत आहात. गुढवाद, गुप्त विद्या या भय उत्पन्न करणार्या गोष्टी तुमच्या मनात शिरल्या आहेत. आपण सर्व महान आत्मा आहोत. आपल्यात केवळ परमेश्वराचा अंश नाही तर प्रत्येकातच परमेश्वर विद्यमान आहे. जो अविनाशी, अनादिअनंत, शुद्ध, सर्वशक्तिमान व सर्वव्यापी आहे असा आत्मा प्रत्येकाच्या ठायी विद्यमान आहे. आपल्याला सामर्थ्य हवे आहे. आत्मविश्वास हवा आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती हवी आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास १६ शके १९४८
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२६
★ पितृपक्ष – त्रयोदशी श्राध्द
★ १९२६ भारदस्त आवाजाने संवादफेक करुन प्रेक्षकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारे हिंदी चित्रपट अभिनेते कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचा जन्मदिन.
★ १९३२ इंडियन एअर फोर्स अॅक्टद्वारे भारतीय वायूसेना स्थापना झाली.
★ १९७९ संपूर्ण क्रांतीचे प्रवर्तक, लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा स्मृतिदिन.
★ भारतीय वायूसेना दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

