
सावरगाव, (प्रतिनिधी ) दि. ८ ऑक्टोबर २०२६ : माध्यमिक विद्यालय, सावरगाव येथे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी “जागतिक धर्म परिषद, शिकागो येथील स्वामी विवेकानंदांचे भाषण” या विषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून श्री. सूर्यकांत सोनवणे सर उपस्थित होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर तसेच शिकागो येथील ऐतिहासिक भाषणातील विचारांवर प्रभावीपणे आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी स्वामीजींचे प्रेरणादायी विचार, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास, मानवता आणि युवकांना दिलेला संदेश याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मिलिंद श्रीवास्तव होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावेत, असे मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे श्री. सूर्यकांत सोनवणे सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग व कथा विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सूर्यवंशी सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. डोमाडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

