
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४१८ वा दिवस

आपल्या सध्याच्या दृष्टिकोनातून हे जग आपल्या इच्छाशक्तीचा आणि ज्ञानशक्तीचा आविष्कार असल्याचे वाटते. आपले अस्तित्व जितके सत्य आहे, सगुण ईश्वरही तितकाच सत्य आहे, तो त्यापेक्षा अधिक सत्य नाही. आपले रूप ज्याप्रमाणे दिसू शकते, त्याचप्रमाणे ईश्वरालाही साकारस्वरूपात बघता येणे शक्य आहे. जोपर्यंत आपण मनुष्य आहोत तोवर आपल्याला ईश्वराची गरज असणारच; ज्या वेळी आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप होऊन जाऊ त्या वेळी मग आपल्याला ईश्वराची गरज उरणार नाही. म्हणूनच, श्रीरामकृष्णांना ती जगज्जननी सदैव सतत त्यांच्या स्वतःजवळ असलेली दिसे त्यांच्या भोवतालच्या दुसऱ्या कोणत्याही वस्तूपेक्षा ती त्यांच्यापक्षी जास्त खरी असे, परंतु समाधिअवस्थेत मात्र साऱ्याचाच लोप होऊन केवळ आत्माच काय तो त्यांच्या अनुभवास येत असे त्या अवस्थेत मग आत्म्याखेरीज आणखी काहीही त्यांच्या अनुभवास येत नसे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास १७ शके १९४८
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर २०२६
★ पितृपक्ष – चतुर्दशी श्राध्द
★ १६३५ वीर जिवा महाले यांचा जन्मदिन
★ १८७७ ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पंडित गोपबंधुदास तथा उत्कलमणी यांचा जन्मदिन
★ १८९२ इतिहासकार, समाजसुधारक, पत्रकार, शतपत्रेकार, लोकहितवादी रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचा स्मृतिदिन.
★ १९७० भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपूर्द
★ जागतिक टपाल दिन.

