
ठाणे [ वृत्तसेवा ] श्री स्वामी समर्थ कृपाकिंत, शिक्षण महर्षी ऐड. बापूसो. कै.संभाजीराव यशवंतराव पगारे प्रेरीत,,गावगाडा निर्मित, श्री साहेबराव नंदन तात्या ताहाराबादकर नाशिक संपादित, सगर साहित्याची ५ व्या वर्षातील अनमोल साहित्यकृती, सगर दीपोत्सव दिवाळी अंक २०२६ च्या मुखपृष्ठाचे अनावरण, नुकतेच जेष्ठ साहित्यिका सौ. सुनिता अरविंद महाजन B sc. BEd विज्ञान गणित विषयाच्या निष्णांत मा. सह शिक्षिका मिराभाईंदर जि. ठाणे यांच्या हस्ते मिराभाईंदर येथे त्यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाले.

लवकरचं दिवाळी पर्वात संगर दीपोत्सव दिवाळी अंक २०२६ रसिक वाचक यांची वाचनाची भूक भागविण्यासाठी येत आहे. अशी माहिती दिवाळी अंकाचे समिती सदस्य व ग्रामिण आवाज न्यूजचे संपादक दादासो. श्री अमृत घरटे सामोडे यांनी दिली.
ह्या अंकात ज्ञान रंजन मनोरंजन व्यक्तिविशेष अध्यात्म ते कथा कविता अलक अशा बहुविध विषयांचा अनमोल साहित्य खजिना वाचकांना मंत्रमुग्ध करेल यात शंकाच नाही. विशेष सांगायचे झाल्यास सगर दीपोत्सव दिवाळी अंक ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक प्रकाशित असुन, ना नफा ना तोटा ह्या तत्वावर आधारीत आहे. रसिक वाचक जाहिरातदार मित्र परिवार यांच्या सहयोगदानातून प्रिटींग पोस्टेज प्रकाशन ट्रॅव्हलिंग इ. खर्च भागविला जातो. सदरचा अंक अंकाशी सलग्न संबंधित व जेष्ठश्रेष्ठ साहित्यिकांना महाराष्ट्रात विनामुल्य सस्नेह भेट केला जातो. ह्या ही वर्षी दिवाळी पर्वात सर्वत्र ऑनलाईन ऑफलाईन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वितरीत करण्याचा माणसं असल्याचा मनोदय व्यवस्थापक स्पप्नीलकुमार नंदन यांनी बोलून दाखवला आहे.

