
*निफाड (प्रतिनिधी ) दि. ९ ऑक्टोबर २०२६ -कृषी सहाय्यक तालुका संघटना अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत *श्री. अमोल सोमवंशी यांनी श्री. जयेश निर्भवणे यांचा 23 विरुद्ध 8 अशा 15 मतांच्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय* संपादन केला आहे.या निवडणुकीत एकूण 31 कृषी सहाय्यकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये *विजयी उमेदवार श्री. अमोल सोमवंशी यांना 23 मते* मिळाली तर *श्री. जयेश निर्भवणे यांना 8 मते* मिळाली.निकाल जाहीर होताच तालुका कृषी कार्यालयात एकच जल्लोष झाला. उपस्थित सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आणि शेतकरी मित्रांनी श्री. सोमवंशी यांचा भगवा फेटा, शाल आणि पुष्पहार घालून जंगी सत्कार केला. [छायाचित्र सोबत]या विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अमोल सोमवंशी म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवून 23 सहकाऱ्यांनी मला मत दिले, त्यांचा मी ऋणी आहे. तसेच लोकशाही प्रक्रियेत सहभागी झालेले श्री. जयेश निर्भवणे यांचेही मी आभार मानतो. यापुढे सर्वांना सोबत घेऊन कृषी सहाय्यकांच्या प्रश्नांसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेन.”या निवडीबद्दल *सोमेश्वर नैसर्गिक शेती शेतकरी गट, सुंदरपूर (निफाड)व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

