
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२१ वा दिवस

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कारः स्वरात्मिका।
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता॥
सर्वशक्तिमत्ता, सर्वव्यापिता आणि अनंत करुणामयता हे जगज्जननी भगवतीचे गुण होत. ती ह्या जगातील, ह्या विश्वब्रह्मांडातील समस्त शक्तीची समष्टी आहे. विश्वात आढळून येणारा शक्तीचा प्रत्येक आविष्कार म्हणजे ती जगदंबाच होय. तीच प्राणरूपिणी होय, तीच बुद्धिरूपिणी होय, तीच प्रेमरूपिणी होय. ती समस्त विश्वात भरून आहे, आणि परत ह्या विश्वाहून संपूर्ण पृथक आहे. ती सगुण आहे, ती एक व्यक्ती आहे. तिला जाणणे शक्य आहे. पाहता येणे शक्य आहे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २० शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द २
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. १२ ऑक्टोबर २०२६
★ १९११ विजय मर्चंट क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्मदिन
★ १९२१ लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार आदी क्षेत्रात कार्यरत, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक जयंतराव श्रीधर टिळक यांचा जन्मदिन
★ १९२२ सुप्रसिध्द मराठी कवयित्री, लेखिका शांता शेळके यांचा जन्मदिन.
★ १९६७ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन.
★ जागतिक संधीवात निवारण दिन.

