
भालूर ( प्रतिनिधी ) म.वि.प्र. संचलित जनता विद्यालय,भालूर येथे दिनांक 10 /10/2026 वार शनिवार रोजी आकाश कंदील कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक माननीय श्री.वैद्य सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयातील कला शिक्षिका श्रीमती संध्या पाटील मॅडम यांनी या कार्यशाळेसाठी अथक परिश्रम घेतले. या स्पर्धेत पाचवी ते दहावी च्या 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.मोरे सर,श्री.गायकवाड सर, श्री.करवर सर, श्री. शेवाळे सर,श्री सहारे सर,श्री भरसट सर, श्रीमती पवार, मॅडम श्रीमती शिनगारे मॅडम सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

