
निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी विजय बाळासाहेब सोमवंशी यांना महाराष्ट्र राज्य उस उत्पादक संघाचा उस भूषण कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
शेती क्षेत्रातील अनेक आव्हानांचा सामना करीत उस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग करणारा शेतकरी म्हणून सुंदरपूर व पंचक्रोशीत त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.आपल्या ज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा म्हणून त्यांनी अनेक उस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. सध्याच्या काळातील प्रतिकूल परिस्थितीत जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर केलेल्या नियोजनामुळे अधिक ऊस उत्पादन घेऊन ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
उस भूषण कार्य गौरव पुरस्काराचे वितरण १५ आक्टोंबर रोजी ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील कार्यक्रमात होणार आहे सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल निफाडचे आमदार दिलीपकाका बनकर, आमदार गोकुळभाऊ गीते,माजी आमदार अनिल आण्णा कदम , राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे,दुध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढेपले, न्या.रानडे विद्या प्रसारक मंडळाचे सचिव रतनतात्या वडघुले,माजी पंचायत समिती सदस्य भैय्यासाहेब देशमुख आदिंनी अभिनंदन केले आहे.

