क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय योगासन स्पर्धा सिल्व्हर लोटस स्कूल, सिन्नर येथे आयोजित करण्यात आली.
योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा सुंदर संगम आहे. योग आपल्याला केवळ निरोगी बनवत नाही, तर मन शांत आणि एकाग्र करतो. आजच्या धावपळीच्या जीवनात योग हाच खरा आपला आधार आहे. शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात भाजपचे युवा नेते उदय भाऊ सांगळे व महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ सचिव एस. बी .देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वती, बळ व शक्तीचे दैवत महाबली हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले
यावेळी व्यासपीठावर संचालिका सोनल बिन्नर, तालुकास्तरीय योगा स्पर्धेचे पंच नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव पिराजी नरवाडे, उपाध्यक्ष दीपक उपासनी, कोषाध्यक्ष मंदार भागवत, राहुल चौधरी, शुभांगी डांबलकर, तन्वी पवार व आकांक्षा दिवेकर, शाळेच्या एच आर मनीषा गुरुळे, प्राचार्या स्वाती गोळेसर, उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे, मुख्याधिकारी कविता डावखर ,शाळेचे योगशिक्षक राजेंद्र नन्नावरे व शीला नन्नावरे, पालक शिक्षक संघाचे सदस्य गणेश खोलमकर, क्रीडाशिक्षक अशोक गायकवाड, संगीत शिक्षक भारत मांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीत शिक्षक भारत मांडे व शाळेतील विद्यार्थी यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी संगीताच्या तालावर अतिशय सुंदर असा *योगा डान्स* सादर केला. वेगवेगळ्या योगासनांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी सर्वांची मन जिंकली.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल
सदर तालुकास्तरीय योग स्पर्धेमध्ये तालुक्यातील दहा शाळांमधील 14 वर्षाखाली , 17 वर्षांखालील आणि 19 वर्षाखाली वयोगटामध्ये सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . स्पर्धा सुरू होण्याआधी दीपक उपासनी यांनी स्पर्धकांना नियम व अटी समजावून सांगितल्या. स्पर्धेदरम्यान सकारात्मक ऊर्जा मुलांमध्ये जाणवली.
युवा नेते उदय भाऊ सांगळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले, की योगाची खरी किंमत ही साठीत गेल्यावर कळते, पण आजच्या युवा पिढीने ही गोष्ट आजच आत्मसात केली आहे. आजच्या मोबाईल आणि धावपळीच्या युगात योगा हा मनःशांतीचा सर्वोत्तम मार्ग आहे. एस बी देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की दिलीप बिन्नर यांनी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त केले तसेच योग हा आपल्या अविभाज्य घटक झाला आहे.योगामुळे आपली एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर लवचिक बनते, आळस कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच पिराजी नरवाडे यांनी आपल्या भाषणातून स्पर्धकांना प्रोत्साहित केले आणि योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
अध्यक्षीय भाषणात दिलीप बिन्नर यांनी सांगितले ,की योगामुळे मनाची एकाग्रता वाढते. आणि तणाव दूर होण्यास मदत होते. स्पर्धेचे नियोजन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुकही केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कदम व प्रास्ताविक राजेंद्र नन्नावरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमूल्य असे सहकार्य लाभले.