
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२२ वा दिवस

शाक्त लोक विश्वातील त्या सर्वव्यापी शक्तीची 'आई' म्हणून पूजा करतात, कारण 'आई' ह्या नावापेक्षा गोड नाव दुसरे आणखी कोणतेच नाही. भारतात माताच स्त्रीत्वाचा सर्वोच्च आदर्श आहे मातृत्व हाच स्त्रीत्वाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार होय. भगवंताची याप्रमाणे माता म्हणून पूजा करण्याला, प्रेमाची घनीभूत मूर्ती म्हणून पूजा करण्याला हिंदुलोक 'दक्षिणाचार' वा 'दक्षिणमार्ग' म्हणतात; ह्या उपासनेने आपली आध्यात्मिक उन्नती होते, मुक्ती लाभते. जननी हीच शक्तीचा आद्य आविष्कार होय, आणि जननी ही कल्पना भारतात जनक ह्या कल्पनेपरीस श्रेष्ठ मानली जाते. 'आई' म्हणताच शक्ती, सर्वशक्तिमत्ता, ईश्वरी शक्ती इत्यादी भाव उत्पन्न होतात; जसे, लहान मुलाला आपली आई सर्वशक्तिमान वाटत असते, ती काय वाटेल ते करू शकते अशी त्याची भावना असते! ती जगज्जननी भगवतीच आपल्यातील निद्रिस्त कुंडलिनी होय. तिची आराधना केल्याखेरीज आपण कधीच स्वतःला जाणू शकणार नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २१ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द ३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२६
★ १२४० हिंदूस्थानातील पहिल्या महिला राज्यकर्त्या रझिया सुलतान यांचा स्मृतिदिन.
★ १९११ भारतीय संस्कृती व स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबेल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा स्मृतिदिन.
★ १९११ प्रदिर्घ कारकिर्दीत ४०० चित्रपटात भूमिका करणारे अभिनेते, पद्मश्री अशोक कुमार गांगुली ‘दादामुनी’ यांचा जन्मदिन
★ १९८७ पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा स्मृतीदिन
★ जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिन.

