
नासिक (प्रतिनिधी ) =इनोव्हेटिव्ह मेकर्स अकादमी फौंडेशन नासिक यांच्या संस्थे कडुन वृषाली वानखेडे”” माझी मी भारी!! विशेष नारी सन्मान पुरस्कार 26 “” संस्थापक प्रा. आशा बिरारी पाटील यांनी घोषित केलेला आहे. संघर्षातुन कर्तृत्वाकडे प्रेरणादायी उजवलं वाटचाल करणाऱ्या, आयुष्याने कितीही कठीण प्रसंग समोर आणले तरी स्वतःच स्वतःचा आधार बनून स्वाभिमानाने आणि जिद्दीने उभ्या राहिलेल्या वृषाली वानखेडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. एका मोठया विशेष कार्यक्रमा मध्ये, दिनांक 18 ऑक्टोबरला होणाऱ्या या कार्यक्रमा साठी विशेष नारी सन्मानासाठी सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक यांनी वृषाली वानखेडे यांचे नामांकन केलें असून पुरस्कार घोषित झाल्याने वृषाली वानखेडे यांच्या जीवनातील संघर्ष ला समाजातून एक प्रकारे न्याय मिळाला आहे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी पुरस्कार घोषित झाल्या बद्दल वृषाली वानखेडे यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे!!

