
इंदिरा माध्यमिक विद्यालयात आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन करताना मविप्र देवळा तालुका संचालक मा.श्री.विजय(नाना) पगार यांच्यासह मुख्याध्यापक श्री.केदार सर अन्य मान्यवर.
वासोळ-: (प्रतिनिधी) म.वि.प्र.च्या पुढाकारातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; गरजू रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ…
वासोळ : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून समाजातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे देवळा तालुका संचालक श्री.विजय(नाना)पगार यांनी केले. वासोळ येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आणि देवळा तालुका संचालक श्री.विजय (नाना)पगार यांच्या संकल्पनेतून वासोळ व परिसरातील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये एकूण ८७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.तपासणीनंतर आवश्यक असलेल्या काही रुग्णांना मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात मोफत शस्त्रक्रिया व पुढील उपचारांसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष दगडु काका भामरे स्वप्निल अहिरे लोकनियुक्त सरपंच वासोळ तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील,कैलास भामरे,भारत अहिरे,शांतीलाल भामरे,जिभाऊ भामरे,गोविंद भामरे,नंदु केदारे,वैभव केदारे,समाधान सोनवणे,पुंजाराम बागुल,सतिष बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सतिष केदार व शिक्षक वृंद यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यालयाच्या गीतमंचाने स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर शिबिरासाठी उपस्थित असलेल्या डॉ.बडगुजर आशिष,डाॅ.श्वेता टेके,डाॅ.शामल जटाड डाॅ.अनुष्का देशमुख शिबिर समन्वयक रवी सोनवणे व नर्सिग स्टाप यांचा विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय मनोगतात विजय पगार यांनी मविप्र संस्थेच्या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात,आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित रहावे लागू नये आणि गरजू रुग्णांना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी अशा उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.या शिबिराच्या माध्यमातुन मोतीबिंदूची लक्षणे असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन मिळाल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.गुजर एस.एन.श्री.आहेर एस.सी.यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री.सावंत सर यांनी केले.

