
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२३ वा दिवस

न गृहं गृहमित्याहुः गृहिणी गृहमुच्यते।
गृहं तु गृहिणीहीनम् अरण्यसदृशं मतम् ॥
केवळ दगड, विटा, चुना, सिमेंट या निर्जीव वस्तूंनी बांधलेल्या वाड्याला वा इमारतीला ‘घर’ म्हणत नाहीत, घराला घरपण म्हणजे प्रेम, जिव्हाळा, सुरक्षितता आपुलकी येते गृहिणीमुळे. स्त्रीच्या अस्तित्वाशिवाय आणि तिच्या मायेशिवाय घर हे केवळ एक निर्जीव पिसारा आहे. अशा घराला काही किंमत नाही. केवढे सत्य साठविले आहे या विधानात ! घर हे केवळ उण, वारा, पाऊस थंडी यांपासून रक्षण करणारे साधन नसून, तो एक कौटुंबिक आणि भावनिक आधार असतो. जे घर थंडीवाऱ्यापासून रक्षण करते त्या घराच्या गुणदोषांचे विवेचन करताना ते ज्या खांबांवर उभे आहे त्यांचाच नुसता विचार करून भागणार नाही, मग ते खांब ‘कॉरिन्थियन स्तंभा’ प्रमाणे कितीही सुबक खोदकामाने शृंगारलेले असोत. घराचा विचार करावयाचा झाल्यास लक्षात घ्यायला हवा तो ‘चेतन स्तंभ’ ज्यावर खरोखर ते घर उभे असते. तो स्तंभ म्हणजे गृहिणी हा होय.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २२ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द ४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६
★ १९४७ साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा ’तात्यासाहेब’ केळकर यांचा स्मृतीदिन
★ १९५३ महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक रघुनाथ धोंडू कर्वे यांचा स्मृतीदिन
★ १९९४ सुप्रसिध्द जेष्ठ इतिहासकार सेतू माधव पगडी यांचा स्मृतिदिन.
★ २००४ स्वदेशी जागरण मंच व भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचा स्मृतिदिन.
★ २०१३ वनराईचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते मोहन धारिया यांचा स्मृतिदिन.
★ आंतरराष्ट्रीय मानक दिवस
★ धम्मचक्र प्रवर्तन दिन. (तारखेनुसार)

