
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४२५ वा दिवस

आमच्या देशातील स्त्रियांना तुमची ती बौद्धिक उंची प्राप्त झाली तर ते मला अतिशय आवडेल; परंतु ही गोष्ट पावित्र्याचा बळी घेऊन होणार असेल तर ते मला नको आहे. तुमच्या सर्व ज्ञानाबद्दल मला तुमचे कौतुक वाटते. परंतु, जे वाईट आहे त्यावर गुलाबांचे पांघरूण घालून त्याला लपविण्याचा आणि त्यालाच चांगले म्हणण्याचा तुम्ही जो प्रयत्न करता, तो मला मुळीच आवडत नाही. बौद्धिक विकास हीच काही सर्वांत जास्त श्रेयस्कर अशी गोष्ट नव्हे. आम्ही नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठीच प्रयत्न करीत असतो. आमच्याकडील स्त्रिया फारशा सुविद्य नाहीत हे खरे. परंतु त्या अधिक शुद्ध आहेत. प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीखेरीज इतर सर्व पुरुष पुत्रवत् मानले पाहिजेत. महिलांचा विकास करतांना जिथे आधुनिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीतील नैतिकता यांचा सुंदर संगम असेल. शिक्षणाने बुद्धीचा विकास व्हावा, पण मनाचे पावित्र्य आणि चारित्र्य कदापि नष्ट होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी लागेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर अश्विन इषमास २४ शके १९४८
★ अश्विन शुक्ल /शुध्द ६
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर २०२६
★ १६७० शिख सेनापती बंदा बहादूर यांचा जन्मदिन
★ १८४६ डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.
★ १८९६ स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक लोकसभेचे हंगामी सभापती शेठ गोविंद दास यांचा जन्मदिन
★ १९०७ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे सुपुत्र सोपानराव चौधरी यांचा जन्मदिन.
★ जागतिक भूजलतज्ञ दिन.
★ जागतिक अन्न दिन..

