
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत २०४७ सेवा संकल्प उपक्रमा’अंतर्गत विद्यापीठात वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून विविध स्पर्धकांनी यश संपादन केले आहे.

प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी सदस्य-सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली तर वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन डॉ. राजेंद्र बगाटे, चित्रकला स्पर्धेचे संयोजन प्रा. सुजाता मोरे आणि रांगोळी स्पर्धेचे संयोजन डॉ. शायिन शेख यांनी केले.

वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. बाळासाहेब दिघे, डॉ. सविता मुंढे, चित्रकला स्पर्धेचे परीक्षण प्रा. अस्मिता राजोळे, डॉ. जागृती चव्हाण, तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण डॉ. रश्मी रानडे, डॉ. ज्योती दोंदे यांनी केले. परीक्षण समित्यांनी पुढील निकाल निश्चित केला.

वक्तृत्व स्पर्धेत श्रेया गलांडे, राजन माने यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला. स्वाती कांबळे, प्रितम खंडागळे यांनी विभागून द्वितीय क्रमांक, तर जयश्री कोळी, कोमल सोनवणे यांनी विभागून तृतीय क्रमांक मिळविला. आर्या शिंदे, अजित गायकवाड, सुप्रिया कुमावत, पूजा बडे आणि शिखर लाहू यांची उत्तेजनार्थ गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात आली.
चित्रकला स्पर्धेत श्रेया गलांडे, शेख हीना गुलाब यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला. मनीषा बोराटे, सुप्रिया कुमावत यांनी विभागून द्वितीय क्रमांक, तर भास्कर भुर्के, अजय मोरे यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला. सायली कुंभार, विजय भंडारे, दीपक कारंजकर, कविता सावंत, महेंद्र रसाळ, अजित गायकवाड, मिलिंद जाधव, मेघाताई शेगोकार, ज्योत्स्ना खंडारे, चारुशीला जगदाळे आणि सुनैना बाविस्कर यांची उत्तेजनार्थ गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात आली.
रांगोळी स्पर्धेत मंगल रोंगे, जोत्स्ना पतंगे यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला. साक्षी दाभोळे, कविता सावंत यांनी विभागून द्वितीय क्रमांक, तर सायली कुंभार, कोमल सुतार यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला. अंजली कुयाते, सुयोग ढेरे, पूनम फाळके यांची उत्तेजनार्थ गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात आली.
या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि कलात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

