
नाशिक (.प्रतिनिधी ) ता. १७ येथील गिरणा गौरव प्रतिष्ठान च्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त निरोगी जीवनाचा मंत्र या विषयावर सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे सुंदर जगण्याचा मंत्र या विषयावर विशेष व्याख्यान व कसमादे भागातील आयुष्यभर आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा धन्वंतरी जीवन गौरव पुरस्काराने तसेच सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या आरोग्यदूतांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठांनच्या वतीने डॉ. प्रशांत पवार डॉ. महेश पाटील डॉ. रोहित ठाकरे डॉ. राहुल पगार डॉ. भूषण देवरे डॉ. हेमंत साबळे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव,माजी खासदार डॉ. भारती पवार, आ.डॉ. राहुल आहेर,
महापौर हिमगौरी आहेर आडके,डॉ. तुषार शेवाळे, डॉ. विलास बच्छाव,डॉ. प्रशांत देवरे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.संजय पाटील, डॉ. व्ही. डी. निकम, डॉ. दिग्विजय शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. अभिमन्यू पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार १९ जुलै रोजी दुपारी ३. ३० वाजता शंकराचार्य कृतकोटी गंगापूर रोड नाशिक येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले असून,
यावेळी डॉ. शरदचंद्र वाघ, कळवण, डॉ. रूपाली गांगुर्डे कळवण, डॉ. रमलाल सुराणा देवळा, डॉ. मिलिंद परिपत्यदार मालेगाव,डॉ. तुळशीराम आहेर नाशिक,डॉ. दिनेश बच्छाव नाशिक, डॉ. शुभदा माजगावकर सटाणा,डॉ. रमणलाल बंब सटाणा,डॉ.सुगंन बरंठ मालेगाव, डॉ. के एम सोनवणे नाशिक, डॉ. अशोक निकम नाशिक यांनी ४० वर्ष पेक्षा अधिक काळ आरोग्य सेवा दिल्याबद्दल धन्वंतरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणारा असून, सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉ. सुधीर भामरे नाशिक,डॉ. मोना अहिरे नाशिक, डॉ. किरण पाटोळे नाशिक,डॉ. जयवंत आहेर नाशिक, डॉ. वसंत सूर्यवंशी अभोणा,डॉ. अरविंद पगार नाशिक, डॉ. उज्जैन इंगळे झोडगे, डॉ. दीपा पवार सटाणा, डॉ. दीपक पाटील मालेगाव, डॉ. अभय निकम मालेगाव, डॉ. रणजीत सुपाते मालेगाव, डॉ. व्हि.डी आहेर देवळा,डॉ. अरुणा मोरे नाशिक, डॉ. प्रकाश चव्हाण नामपुर, डॉ. शांताराम पवार उमराळे, डॉ. संजय शिरसाट देवळा, डॉ. रत्ना बच्छाव पिंपळगाव, डॉ. राजेंद्र ब्राह्मणकर दहिवड,डॉ. समाधान सोनवणे कळवण, डॉ. रीना ढिकले नाशिक,डॉ. नितीन महाजन नाशिक, डॉ. उज्वल कापडणीस मालेगाव यांचा उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल आरोग्यदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नाशिक येथे झालेल्या निवड समितीच्या विशेष बैठकीत डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. अनिल निकम, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. समीर चंद्रात्रे,डॉ. निलेश निकम या निवड समितीने कसमादे धन्वंतरी जीवनगौरव पुरस्कार व सर्वोत्कृष्ट आरोग्यदूत पुरस्काराची घोषणा केली. लोकमान्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक रोहित ठाकरे, निदान हार्ट केअर चे संचालक डॉ. प्रशांत पवार, सप्तशृंगी गॅस्ट्रो केअर सेंटरचे संचालक डॉ. महेश पाटील, संजीवनी आयुर्वेद व होमिओपॅथी रिसर्च सेंटर चे डॉ. राहुल पगार, निरामय मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत साबळे,डी.एस. एच मेडिकेअर प्रा. लिमिटेडचे चेअरमन डॉ. भूषण देवरे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, महाराष्ट्र राज्य गिरीजा महिला मंच, पुस्तकावर बोलू काही टीम, गिरणा गौरव परिवार, संपादकीय मंडळ मुक्काम पोस्ट गिरणा गौरव, अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन समिती यांच्या वतीने रवीवार १९ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

