
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४२ वा दिवस

यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य I
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद्वहन्ति II
‘चंदनकाष्ठे वाहणाऱ्या गाढवाला ओझ्याचीच जाणीव होत असते, चंदनाच्या गुणांची नव्हे’. शिक्षण व निव्वळ माहिती ही एकच मानली तर ग्रंथालयांना थोर महात्मे व ज्ञानकोशांना ऋषी म्हणावे लागेल. आपल्या देशाचे आध्यात्मिक व ऐहिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण आपण आपल्या हाती घेतले पाहिजे व शक्यतो ते आपल्याच राष्ट्रीय पद्धतीनुसार दिले पाहिजे हेच आपले ध्येय आहे. अर्थात ही फारच मोठी योजना व फारच मोठे कार्य आहे. ती प्रत्यक्षात येईल किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. पण आपण कामाला लागले पाहिजे. ते कसे करावयाचे? हिंदूंना सर्व गोष्टींच्या आधी धर्म हवा असतो. यावर तुम्ही म्हणाल की मंदिराविषयी विभिन्न संप्रदायांत कलह सुरू होतील. पण आपण हे मंदिर संप्रदायातीत बनवू; सर्व संप्रदायांचे सर्वोच्च प्रतीक जे ‘ॐ’ तेच केवळ या मंदिरात राहील. येथे जर असा एखादा संप्रदाय असेल की ज्याला ‘ॐ’ हे प्रतीक असू नये असे वाटत असेल, तर त्याला स्वतःस हिंदू म्हणविण्याचा अधिकार नाही. आपापल्या संप्रदायांच्या तत्त्वांनुसार हिंदुधर्माचा अर्थ लावण्याची प्रत्येकास मोकळीक राहील, पण आपले एक सर्वसामान्य मंदिर असलेच पाहिजे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ३ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शनिवार दि. २५ जुलै २०२६
★ देवशयनी आषाढी एकादशी 🚩🚩🚩
★ चातुर्मास प्रारंभ…
★ १८८० स्वदेशी चळवळीचे प्रणेते, समाजसुधारक, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका यांचा स्मृतीदिन.
★ १९१९ सुप्रसिध्द गायक, संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचा जन्मदिन.
★ १९९७ के. आर. नारायणन भारताचे दहावे व पहिले दलित(मल्याळम) राष्ट्रपती झाले.
★ २००७ श्रीमती प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी विराजमान.
★ आषाढी एकादशीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा… जय हरि माऊली II
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

