
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४४ वा दिवस

भारतात वरवर पाहता परस्परविरोधी वाटतील असे अनेक संप्रदाय अस्तित्वात आहेत, आणि तरीही ते सगळेच्या सगळेच एकमेकांशी न झगडता खेळीमेळीने, आनंदाने येथे नांदत आहेत. या अपूर्व घटनेचे एकमेव स्पष्टीकरण म्हणजे आमच्यातील हा परधर्माविषयीच्या द्वेष भावनेचा अभाव. तुम्ही कदाचित दैववादी असाल मी कदाचित अदैववादी असेल, तुमचा कदाचित विश्वास असेल की तुम्ही भगवंताचे नित्यदास आहेत तर दुसरा कदाचित म्हणेल की मी भगवंताशी अभिन्न आहे. तरीपण तुम्ही दोघेही अस्सल हिंदूच आहात. हे कशामुळे शक्य आहे. *'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति' ऋग्वेद - मंडल १, सूक्त १६४, ऋचा ४६* (सत्य एकच आहे, पण ज्ञानी किंवा विद्वान लोक त्याला अनेक नावांनी संबोधतात) हे महावाक्य वाचा म्हणजे हे कसे नि कशामुळे शक्य आहे हे तुम्हाला कळून येईल. माझ्या बंधुंनो सगळ्यांपेक्षा हेच महान सत्य आपल्याला जगास शिकवावे लागेल.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ५ शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. २७ जुलै २०२६
★ महाराष्ट्रीय बेंदूर
★ १९७५ गांधीवादी नेते, भारतीय राज्यघटना मराठी भाषेत अनुवादित करणारे, खासदार त्र्य. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर यांचा स्मृतीदिन.
★ १९८७ जागतिक किर्तीचे पक्षीतज्ञ, बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक, डॉ. सलीम अली यांचा स्मृतीदिन.
★ २०१५ मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतीदिन.

