
साकोरे:(प्रतिनिधी )मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नाशिक चे विशेष कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मा. रोहितकुमार राजपूत यांनी दत्तक घेतलेल्या बरडवस्ती (साकोरे,ता. निफाड) शाळेतील विद्यार्थ्यांची सखोल सर्वांगीण आरोग्य तपासणी मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली. यात आरबीएसके पथक, ओझर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय निफाड व प्राथमिक आरोग्य केंद्र साकोरे या चार पथकांनी सहभाग घेतला. बरडवस्ती शाळेबरोबरच साकोरे व बोरस्ते वस्ती शाळेचीही आरोग्य तपासणी या उपक्रमात करण्यात आली. याप्रसंगी सीएमआरएफ पोर्टलवर विद्यार्थ्यांची स्कॅनिंग करून प्रत्यक्ष तपासणी व पालकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन औषधे व इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या. याप्रसंगी पालक व विद्यार्थी आरोग्य विषयक जागरूक असल्याने पथकाने समाधान व्यक्त केले . शिबिराचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने करण्यात आली. तपासणी प्रसंगी या उपक्रमासाठी डॉ. बैरागी सर, डॉ. वैशाली कदम (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळगाव), डॉ. सागर गोऱ्हे (समुदाय आरोग्य अधिकारी), डॉ. रवींद्र कदम (बालरोग तज्ञ), डॉ. कांचन उशीर (बालरोग तज्ञ), डॉ. रोहित जगियासी (दंतरोग तज्ञ), डॉ. सुभद्रा (दंतरोग तज्ञ), डॉ. प्रशांत टर्ले (संचालक, ओझर हॉस्पिटल), डॉ. आशिष रंजवे तसेच श्री. महेश नारायणकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सर्वांच्या समर्पित सेवेमुळे हे शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

