
वासोळ:-(प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या इंदिरा माध्यमिक विद्यालयात गुरु शिष्याची महती सांगणारी गुरुपौर्णिमा मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केदार एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात महर्षी गुरु व्यासमुनी यांच्या प्रतिमेच्या पुजनाने अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आली. इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य श्री.गोरख भामरे, स्वप्निल आहिरे लोकनियुक्त सरपंच वासोळ, भारत आहिरे, नंदु केदारे व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरवातीला विद्यार्थ्यांची भाषणे झाली व नंतर श्री.केदार एस.एस.व श्री.आहेर एस.सी.यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले. उपशिक्षक श्री.निकम एस.के.श्रीम.गुजर एस.एन.श्री.सावंत व्ही.बी. श्री.आहेर एस.सी.श्री.पवार आर.एस.श्री.चौधरी आर.एस.श्री.ठाकरे एस.डी.श्रीम.मोरे जे.आर. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इ.१०वीच्या विद्यार्थीनी कु. गिरासे योगिनी व गिरासे वैष्णवी यांनी केले.

